
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली युटय़ूबर ज्योती मल्होत्रा आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिसार न्यायालयात हजर झाली. सुनावणीनंतर न्यायालायने ज्योतीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 7 जुलै रोजी होणार आहे. 16 मे रोजी हिसार पोलिसांनी ज्योतीला तिच्या घरातून अटक केली होती. 23 जून रोजी न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत पाठवले. दरम्यान, यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला होता.