
एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना 1 जुलै 2025 पासून जोरदार झटका बसणार आहे. ट्रान्झॅक्शन चार्ज आणि रिवॉर्ड पॉलिसीमध्ये अनेक बदल केला जाणार आहे. याचा थेट परिणाम युजर्सच्या ऑनलाईन गेमिंग, वॉलेट रिचार्ज आणि युटिलिटी बिल पेमेंटवर येणार आहे. ऑनलाइन गेमिंगवर चार्ज, वॉलेट लोडिंग वर चार्ज, युटिलिटी बिल पेमेंटवर चार्ज आकारले जाणार आहे. थर्ड पार्टी अॅप पेटीएम, पह्न पे वरून पेमेंट केल्यास एज्युकेशन फीवर 1 टक्का चार्ज लागणार आहे. इंधन ट्रान्झॅक्शनवर 15 हजार किंवा 30 हजारांपेक्षा जास्त रक्कम असल्यास चार्ज द्यावा लागणार आहे.