
जगभरात सध्या टेस्लाच्या ड्रायवर विना कारची चर्चा सुरू आहे. एलॉन मस्क यांनी नुकतीच जगातील पहिली ड्रायवरलेस कार सादर केली. या इलेक्ट्रिक कारचे मॉडेल वाय एका ग्राहकाने खरेदी केले. या कारची डिलिवरी होण्याची वेळ आली तेव्हा कार स्वतः 30 मिनिटे धावली आणि थेट ग्राहकाच्या घरी पोहोचली. टेस्लाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या कारच्या डिलिव्हरीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
ही कार थेट कारखान्यातून निघते. रस्त्यावरच्या सिग्नलवर थांबते आणि नंतर थेट ज्याने कार खरेदी केलीय. त्याच्या घरी जाऊन पोहोचते. ही कार डिलिव्हरीवेळी जवळपास 116 किलोमीटर प्रति तास वेगाने धावली. ही गाडी कोणत्याही ड्रायवरविना, रिमोट ऑपरेटरविना पार्किंगच्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचली. मस्क यांच्या टेस्ला कंपनीने गेल्या आठवड्यात टेक्सासमध्ये रोबोटॅक्सी सेवा सुरू केली आहे.
34 लाख रुपये किंमत
टेस्लाने मॉडले वायला अपडेट करून नवी कार बनवली. टेस्लाने पहिल्यांदा ही कार 1019 मध्ये लाँच केली होती. या कारची किंमत 34 लाख रुपये आहे. ही कार तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असून परफॉर्मन्स व्हर्जनची किंमत 51 लाख आहे.