जीएसटी कलेक्शन 22.08 लाख कोटींवर

1 जुलै 2017 ला देशभरात लागू केलेल्या जीएसटीला 2025 मध्ये आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये जीएसटी कलेक्शनने एक नवीन विक्रम नोंदवला आहे. जीएसटी कलेक्शन 22.08 लाख कोटींपर्यंत पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.4 टक्के जास्त आहे. यादरम्यान दर महिन्याला सरासरी 1.84 लाख कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. हे आतापर्यंतचे सर्वात चांगले प्रदर्शन आहे.