मस्तच! ‘स्क्विड गेम’चा चौथा सीझन येणार

‘स्क्विड गेम’च्या तिसऱ्या सीझनलासुद्धा चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 27 जूनपासून नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘स्क्विड गेम-3’ ने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या वेब सीरिजचा क्लायमॅक्स पाहून चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सीझनच्या शेवटी एक नवीन सदस्य केट ब्लैंचेटला दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हा खेळ पुन्हा सुरू राहील, असे बोलले जात आहे.