गुगल क्रोमला सायबरचा धोका

सरकारच्या इंडियन कॉम्प्युटर इर्मजन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी) या सायबर सुरक्षा एजन्सीने गुगल क्रोम अपडेट करण्याचा इशारा दिला आहे. गुगल क्रोममध्ये कमतरता असल्याने हॅकर्स तुमच्या कॉम्प्युटरवर नियंत्रण मिळवू शकतात. डेटा चोरी करू शकतात किंवा तुमची सिस्टीम क्रॅश करू शकतात. क्रोम हा असा ब्राउजर आहे ज्याचा वापर दररोज करोडो युजर्स करतात. जर तुम्ही क्रोमला अपडेट केले नाही तर मोठा सायबर धोका निर्माण होऊ शकतो. जुने क्रोम वर्जन अपडेट करण्याचा सल्ला सीईआरटीने दिला आहे. हा धोका केवळ पर्सनल युजर्सला नसून कंपन्या आणि आस्थापनांनाही आहे, जिथे दररोज क्रोम वापरले जाते. यावर खबरदारीचा उपाय म्हणजे गुगल क्रोम ब्राउझरचे ऑटो अपडेट फीचर ऑन करा जेणेकरून सिक्युरिटी अपडेट आपोआप इन्स्टॉल होईल.