मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेशासाठी 10 जुलैपर्यंत मुदतवाढ

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये 2025 – 26 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता 10 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. व्यापक विद्यार्थीहित लक्षात घेऊन सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा तसेच कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.