
इराण-इस्रायलमधील युद्ध थांबले असले तरी दोन्ही देशांत तणाव कायम आहे. इराणवरील हल्ल्यादरम्यान इस्रायलचे अनेक ड्रोन व शस्त्रे इराणी भूमीवर पडली आहेत. यातील बरीच शस्त्रे अत्याधुनिक व सुस्थितीत असून तीच भविष्यात इस्रायलविरोधात वापरण्याची तयारी इराण करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
इराणवर हल्ला करताना इस्रायलने अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला होता. त्यात तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत प्रगत व उच्च क्षमतेच्या शस्त्रांचा व ड्रोन्सचा समावेश होता. त्यात गुप्त माहिती गोळा करण्यासाठी वापरले जाणारे हर्मीस ड्रोन, एफपीव्ही,मिनी-क्वाडकॉप्टर ड्रोनदेखील होते. स्पह्टकांनी भरलेले हे कॉम्पॅक्ट ड्रोन काही सेकंदातच मोठे नुकसान करू शकतात.