
शिवसेना विभाग क्रमांक 9 च्या वतीने चेंबूर व अणुशक्ती नगर विधानसभेतील गटप्रमुख आणि पदाधिकारी यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजता चेंबूर येथील फाईन आर्ट सभागृह येथे हा मेळावा असून शिवसेना सचिव – खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेते – आमदार मनोज जामसुतकर, शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन विभागप्रमुख प्रमोद शिंदे आणि विभाग संघटक पद्मावती शिंदे यांनी केले आहे.