हिंदुस्थानची काही लढाऊ विमाने पडली! नौदल अधिकाऱ्याने सांगितले ‘ऑपरेशन सिंदूर’चे सत्य

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानविरुद्ध राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेदरम्यान हिंदुस्थानची काही लढाऊ विमाने पडली, अशी कबुली हिंदुस्थानी नौदलाचे अधिकारी कॅप्टन शिव कुमार यांनी दिली आहे. ते जकार्ता येथे बोलत होते. हिंदुस्थानने राफेल, मिग-29, सुखोई-30सह पाच लढाऊ विमाने गमावली. तसेच एक ड्रोन, दोन एस-400 लाँचर्स पडल्याचा दावा इंडोनेशियन एअरस्पेस तज्ञांनी केला होता. त्यावर बोलताना आम्ही खूप काही गमावले नाही. मात्र हिंदुस्थानी नेतृत्वाने पाकच्या लष्करी व हवाई तळांवर हल्ले करण्यास मनाई केल्याने काही लढाऊ विमाने निश्चितच पडली, असे ते म्हणाले.