
काही दिवसांपूर्वी विरार लोकलमध्ये महिलांच्या डब्यात तुफान हाणामारी केल्याची घटना घडली होती. यावेळी एका महिलेला गंभीर मारहाण करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता डोंबिवली लोकलमध्ये या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. डोंबिवलीहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये मंगळवारी सकाळी महिलांच्या डब्यात जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सकाळी 8.20 वाजता डोंबिवलीहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये ही घटना घडली. महिलांनी एकमेकींना धक्का दिला, शिवीगाळ करत एकमेकींच्या झिंज्या उपटल्या. लोकलमधील महिलांच्या डब्यात हाणामारी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अन्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.