
कॅनरा बँकेने केंद्र सरकारला आर्थिक वर्ष 2024-25 साठी 2283.41 कोटी रुपयांचा डिव्हिडंड दिला आहे. गेल्या वर्षी बँकेला 16.99 टक्के नफा वाढून 17,027 कोटी रुपयांवर पोहोचला. जो 2023-24 मध्ये 14,554 कोटी रुपये होता. कॅनरा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यनारायण राजू यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे 2283 कोटी रुपयांचा चेक सुपूर्द केला. या वेळी त्यांच्यासोबत कार्यकारी संचालक हरदीप सिंह अहलूवालिया, भावेंद्र कुमार उपस्थित होते.