आयएनएस उदयगिरी युद्धनौका नौदलात!

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल) प्रोजेक्ट 17ए अंतर्गत बनवलेली दुसरी स्टिल्थ फ्रिगेट युद्धनौका आयएनएस उदयगिरी मंगळवारी अधिकृतपणे हिंदुस्थानी नौदलाकडे सोपवण्यात आली. ही युद्धनौका अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर आणि स्टील्थ टेक्नोलॉजीने परिपूर्ण आहे. या नव्या युद्धनौकेमुळे हिंदुस्थानच्या समुद्री मार्गाची सुरक्षा आणखी मजबूत झाली आहे. नवी उदयगिरी एक मल्टी मिशन फ्रिगेट आहे. याला अवघ्या 37 महिन्यांत तयार करण्यात आले आहे.