ममदानी यांनी अमेरिकेत जपली भारतीय संस्कृती, हाताने जेवल्याने सोशल मीडियावर रंगली चर्चा

मूळचे भारतीय असलेले न्यूयॉर्कचे महापौरपदाचे उमेदवार जोहरान ममदानी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अमेरिकेत हाताने जेवत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हिंदुस्थानी युजर्सनी याला भरभरून प्रतिसाद देत ममदानी यांनी अमेरिकेत भारतीय संस्कृती जपली आहे असे म्हटले आहे, तर एका अमेरिकन खासदाराने यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

अमेरिकेतील रिपब्लिकन खासदार ब्रँडन गिल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, अमेरिकेतील सुसंस्कृत लोक हाताने जेवत नाहीत. तुम्हाला जर पाश्चात संस्कृती स्वीकारता येत नसेल तर तुम्ही तुमच्या मागासलेल्या देशात परत जाऊ शकता. यामुळे सोशल मीडियावर ममदानी यांच्या हाताने जेवण्यावरून दोन गट पडल्याचे दिसत आहे. खासदाराने केलेल्या टिप्पणीवरसुद्धा अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी त्यांना ट्रोलसुद्धा केले आहे. जोहरान ममदानी हे अवघ्या 33 वर्षांचे आहेत. ममदानी यांना 2018 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.