
वडिलांनी मुलीसाठी जे धाडस दाखवलं, त्यानं लाखो लोकांची मनं जिंकलीत. ही घटना आहे विशाल अटलांटिक महासागरातील. 14-डेक डिज्नी क्रूझवरून एक लहान मुलगी अचानक समुद्रात कोसळली. चोहोबाजूंनी महाकाय लाटा उसळत होत्या.
आपल्या मुलीला डोळ्यांसमोर बुडताना पाहून वडिलांनी क्षणाचाही विचार न करता, थेट महासागरात उडी घेतली आणि थरारनाटय़ रंगले. ही घटना 29 जून रोजी घडली. डिज्नी ड्रीम नावाची ही लक्झरी क्रूझ बहामाजवरून फ्लोरिडा, फोर्ट लॉडरडेलकडे परत येत होती. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की, समुद्राच्या मध्यभागी एक माणूस आणि एक मुलगी पाण्यात तरंगताना दिसतात. काही वेळात बचाव बोट त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्यांना दोघांनाही सुखरूप वर खेचलं जातं. वडिलांनी तब्बल 20 मिनिटं आपल्या मुलीला पाण्यावर ठेवून तिला सांभाळलं. या व्हिडियोवर नेटीजन्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.