
रत्नागिरीतील आंबा, काजू बागायती भागात आणि डोंगराळ परिसरात वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सरकारकडे केली. दरम्यान, पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव यांनी रत्नागिरीतील एप्रिल आणि मे 2025 मध्ये लागलेल्या वणव्याप्रकरणी पंचनामे सुरू असल्याची माहिती लेखी उत्तरात दिली.