
दहावीचा निकाल लागून आता महिना दीड महिना झाला आहे, मात्र अकरावीची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरळीत झालेली नाही. त्यात घोळ सुरू आहे. ही प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी खासगी कंपनीला कंत्राट दिले आहेत. सरकारने अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी पावले उचलावीत. हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे चर्चा करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. याप्रकरणी सरकारने निवदेन द्यावे, असे निर्देश सभापती राम शिंदे यांनी दिले.