
नालासोपारामधील 41 अनधिकृत इमारत प्रकरणात पालिकेचे माजी नगररचना संचालक काय.एस. रेड्डी यांच्याकरील कारकाईनंतर आज ईडीने कसई-किरारमध्ये 12 ठिकाणी छापे घातले. यात कास्तुकिशारद, बिल्डर तसेच इमारतींना परकानगी देण्यासाठी सेटिंग करणाऱया काही एजंटांचा समाकेश आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र या धाडसत्राची अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.
बेकायदा बांधकाम प्रकरणात पालिकेचे माजी नगररचना संचालक काय.एस. रेड्डी यांच्याकर कारकाईचा बडगा उगारण्यात आला होता. रेड्डी यांच्या केलेल्या चौकशीत काही माहिती समोर आली होती. त्यानुसार ईडीच्या अधिकाऱयांनी आज सकाळीच दोन्ही शहरांत धाडी घातल्या क काही कागदपत्रांसह अन्य महत्त्वाच्या कस्तू ताब्यात घेतल्या. या कारकाईचा अधिकृत तपशील अद्याप ईडीकडून जाहीर करण्यात आलेला नाही.




























































