हिंदुस्थानचा बांगलादेश दौरा दूरच

हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या बांगलादेश दौऱ्याबाबत अद्यापि साशंकता कायम असल्याचे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी सांगितले. बीसीसीआयने आपल्याला सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतरच या दौऱ्याबाबत स्पष्टता मिळू शकले, असे कळवल्याचेही त्यांनी सांगितले.

‘टीम इंडिया’ला 17 ऑगस्टपासून बांगलादेशचा दौरा करायचा आहे. या द्विपक्षीय मालिकेत तीन एकदिवसीय व तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. मात्र, बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे हिंदुस्थान-बांगलादेश द्विपक्षीय मालिका वेळापत्रकानुसार होण्याची चिन्हे काही दिसत नाहीये. ‘हिंदुस्थान चा बांगलादेश दौरा ऑगस्टमध्ये होऊ शकला नाही, तर आगामी काळात त्याचे आयोजन करण्याचा आम्ही प्रयत्न करू,’ असेही अमिनुल इस्लाम यांनी सांगितले.