
‘मुंबईचा राजा’ अशी ख्याती असलेल्या गणेशगल्ली येथील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. शतक महोत्सवी वर्षाकरिता कार्यकारिणी समितीचे गठन करण्यात आले असून शाखाप्रमुख किरण तावडे यांची अध्यक्षपदी तर स्वप्नील परब यांची सरचिटणीसपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. तसेच 2025 ते 2027 या कालावधीत खजिनदारपदासाठी अनुक्रमे अभिषेक शिवलेकर, निखिल नानचे आणि नितेश महाडेश्वर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.