
हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर सरासरी 4.8 लाख रुपये कर्ज आहे. मार्च 2023 मध्ये ते 3.9 लाख रुपये होते. गेल्या दोन वर्षांत त्यात 23 टक्क्यांची वाढ झाली आहे. म्हणजेच प्रत्येक हिंदुस्थानीचे सरासरी कर्ज 90,000 रुपयांनी वाढले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या जून 2025 च्या आर्थिक स्थिरता अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या कर्जात गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड थकबाकी आणि इतर किरकोळ कर्जांचा समावेश आहे. वैयक्तिक कर्जे आणि क्रेडिट कार्ड देयके यासारख्या बिगर-गृहनिर्माण किरकोळ कर्जांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.