शिव विधी व न्याय सेनेतर्फे धारावीत मोफत कायदेशीर सल्ला केंद्र

शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या शिव विधी व न्याय सेनेच्या वतीने धारावीत येत्या 3 जुलै रोजी सायंकाळी 4ः30 वाजता शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर यांच्या हस्ते मोफत कायदेशीर सल्ला केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हा उद्घाटन सोहळा शिवसेना शाखा 184, लक्ष्मी बाग, धारावी इथे होणार आहे.

सर्वसामान्य जनतेसाठी सुरू होणाऱ्या या केंद्राच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक वसंत नकाशे, विधानसभा संघटक विठ्ठल पवार, शाखाप्रमुख आनंद भोसले, शिव विधी व न्याय सेना संघटनेचे अध्यक्ष अॅड. नितीश सोनवणे, उपाध्यक्ष (प्रभारी) अॅड. स्वप्ना कोदे, सरचिटणीस अॅड. मनोज काsंडेकर, चिटणीस अॅड. सुमीत घाग, अॅड. दर्शना जोगदनकर, समन्वयक अॅड. भूषण मेंगडे, जिल्हाध्यक्ष (पश्चिम महाराष्ट्र) अॅड. कोजल कदम, अॅड. अरुल नाडर यांच्यासह मोठय़ा संख्येने पदाधिकारी व वकील बंधू-भगिनी उपस्थित राहणार आहेत.