क्वाड देशांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

हिंदुस्थान, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. यावेळी दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचे आश्वासनही देण्यात आले. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या हल्ल्यातील दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी असे मत व्यक्त केले. बैठकीत दहशतवाद, खनिजे, जागतिक तापमानवाढ, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसह अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा झाली.