विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण; नामांकित शाळेच्या शिक्षिकेला अटक

मुंबईतील एका नामांकित शाळेतील 40 वर्षीय शिक्षिकेचे दृष्कृत्य समोर आले आहे. शिक्षिकाच विद्यार्थ्याला आपल्या वासनेचे शिकार बनवत होती. पंचतारांकित हॉटेलांमध्ये नेऊन तिने वारंवार मुलाचे लैंगिक शोषण केले. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी शिक्षिकेला बेडय़ा ठोकल्या. पण अजूनही मी त्याच्यावर प्रेम करते, असे शिक्षिकेचे म्हणणे असल्याचे समजते.  आरोपी महिला शिक्षिका ही विवाहित असून तिला दोन मुलं आहेत. मध्य मुंबईतील एका नामांकित शाळेत ती कोरोनामध्ये कंत्राटी कामाला लागली.