
कोरोना लस आणि हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचा काहीही संबंध नसल्याचे पेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज पंट्रोल यांनी याप्रकरणी केलेल्या अभ्यासाअंती तयार करण्यात आलेल्या अहवालातून अनेक गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तरुणांमध्ये हृदयविकारामुळे वाढत चाललेल्या मृत्यूंविषयी चिंता व्यक्त केली होती. तसेच तज्ञांची समिती नेमून दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता पेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. देशभरात 40 वर्षांखालील प्रौढांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त होत असताना अनेक निष्कर्ष समोर आल्याचे पेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोनावरील लसीकरण आणि तरुणांमध्ये वाढत असलेले हृदयविकाराचे प्रमाण यांचा कोणताही संबंध नाही. राष्ट्रीयस्तरावर करण्यात आलेल्या अभ्यासाअंती जीवनशैली आणि आधीच्या आजारांना अचानक होणाऱ्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरवण्यात आले. कोरोना महामारीनंतर अनेक ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्यामुळे तरुणांचे मृत्यू होत असल्याचे समोर आले. नाचताना, क्रिकेट खेळताना तरुणांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले होते.


























































