
लंडनमधील एका खासगी पार्टीत हिंदुस्थानातून फरार असलेले उद्योजक विजय मल्ल्या आणि इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष ललित मोदी एकत्र दिसले. दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघं एका गाण्यावर ताल धरताना दिसत आहे. त्यामुळे दोघंही पुन्हा एकदा चर्चेत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांच्यासह काही प्रसिद्ध व्यक्ती पार्टीत आनंद घेताना दिसतात. या कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू क्रिस गेलही उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडीओत हे दोघं फ्रँक सिनात्राचं प्रसिद्ध गाणं ‘आय डिड इट माय वे’ गाताना दिसत आहेत. ललित मोदीनेच हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला असून, तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
View this post on Instagram
या पोस्टसोबत ललित मोदीने लिहिलं आहे की, ‘गेल्या रविवारी माझ्या लंडनमधील घरी झालेल्या पार्टीच्या काही सुंदर आठवणी शेअर करत आहे’. या पार्टीत 310 खास मित्र व कुटुंब असल्याने ही रात्र खास ठरल्याचेही तो म्हणतो. हा व्हिडीओ इंटरनेटवर जास्त व्हायरल होणार नाही, अशी आशा आहे. वादग्रस्त असलो तरी मी नेहमीप्रमाणेच स्वतःच्या मार्गाने चालतो’. ललित मोदींवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असून ते हिंदुस्थानबाहेर वास्तव्यास आहेत. तर दुसरीकडे, विजय मल्ल्याविरुद्ध सुमारे 9,000 कोटी रुपयांचं कर्ज थकवल्याचे प्रकरण सुरू असून, दोघांच्या प्रत्यार्पणासाठी हिंदुस्थानच्या सरकारने यूके सरकारकडे मागणी केल्याची माहिती आहे.
Vijay Mallya & Lalit Modi Party Together in London; Video Goes Viral
A video of absconding businessmen Vijay Mallya and Lalit Modi partying and singing “My Way” in London has gone viral, sparking fresh controversy.