अबुधाबीच्या आकाशात उडणार एअर टॅक्सी

अबुधाबीने शहरातील वाहतूककोंडी सोडवण्याच्या दृष्टीने नवीन क्रांती केली आहे. येथे पहिल्या विनाचालक इलेक्ट्रिक एअर टॅक्सीच्या उड्डाणाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 2026 च्या सुरुवातीला ही सेवा नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेतील आर्चर एव्हीएशन या कंपनीचा हा प्रकल्प असून अबुधाबी हे त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय प्रक्षेपण स्थळ ठरणार आहे. या एअर टॅक्सीचे चाचणी उड्डाण अबुधाबीतील अल बतीन एक्झिक्युटिव्ह एअरपोर्ट येथे पार पडले. चाचणीदरम्यान मिडनाईट इलेक्ट्रिक वर्टिकल केट ऑफ अँड लँडिंग हे पूर्णपणे विजेवर चालणारे आणि शून्य प्रदूषण करणारे विमान शहराच्या आकाशात उडताना दिसले. ही सेवा केवळ श्रीमंत किंवा लक्झरी प्रवाशांसाठी नाही तर सर्वसामान्य जनतेसाठीही किफायतशीर दरात उपलब्ध होणार आहे.