
80 वर्षीय डॉक्टर श्रद्धा चौहान या टँडम स्कायडायव्हिंग पूर्ण करणाऱ्या सर्वात वयस्कर हिंदुस्थानी महिला ठरल्या आहेत. त्यांचा टँडम स्कायडायव्हिंगचा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निवृत्त ब्रिगेडियर सौरभ सिंह शेखावत यांच्या आई डॉक्टर श्रद्धा चौहान यांनी चक्कर येणे, सर्व्हायकल स्पाँडिलायटिस व मणक्याची डिस्क सरकण्याची समस्या असूनही 10 हजार फूट उंचीवरून उडी मारून आपला 80 वा वाढदिवस साजरा केला.
सौरभ यांनी आईला ट्रेनिंग देऊन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे व्हिडीओत दिसते. त्यानंतर दोघेही सुरक्षित साधने परिधान करून विमानात बसले. त्यानंतर विमानातून 10 हजार फूट उंचीवरून उडी मारून दोघांनीही टँडम स्कायडायव्हिंग करण्याचा अनुभव घेतला. सोशल मीडियावर हा ‘स्कायहायइंडिया’ने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केला आहे. नेटिजन्स या व्हिडीओवर जोरदार कमेंट्स करत असून मायलेकाचे भरभरून कौतुक करत आहेत.