क्वाडनंतर ब्रिक्सने केला पहलगाम हल्ल्याचा निषेध; इस्रायलविरोधात इराणला दिले समर्थन

हिंदुस्थान,अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश असलेल्या क्वाडप्रमाणे ब्रिक्स शिखर परिषदेमध्येही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी इस्रायलविरोधात इराणला समर्थनही देण्यात आले.

पहलगाम हल्ला हा केवळ हिंदुस्थानवरच नाही तर संपूर्ण मानवतेवर झालेला हल्ला आहे. दहशतवादाचा निषेध हेच आपले तत्व असले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. 20 व्या शतकात निर्माण झालेल्या जागतिक संस्था 21 व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरल्या आहेत, असे मोदी म्हणाले.