
पाकिस्तानातील लाहोर शहरात एका पाळीव सिंहाने महिला आणि दोन मुलांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिला व दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी सिंह पाळणाऱ्या मालकाला पोलिसांनी अटक केली. मालकाकडे परवाना नव्हता. तसेच त्याने जो निष्काळजीपणा दाखवला त्याबद्दल हा गुन्हा दाखल केला आहे. हा सिंह पिंजऱ्यातून पळाला होता. महिलांवर हल्ला केल्यानंतर सिंह स्वतःहून त्याच्या मालकाच्या फार्महाऊसवर परतला, जिथून पोलिस आणि वन्यजीव अधिकाऱ्यांनी सिंहाला पकडून प्राणीसंग्रहालयात सोडले.