
आयफोन 17 ची नवी सीरिज सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात येणार आहे. नव्या फोनच्या लाँचिंगला अवघे दोन महिने शिल्लक राहिले असताना आयफोन 16 स्वस्त किमतीत मिळत आहे. आयफोन 16 च्या 128 जीबी स्टोरेजच्या फोनला 79,900 रुपये किमतीत लाँच करण्यात आले होते, परंतु आता या फोनला अॅमेझॉनवर थेट सहा हजार 900 रुपयांचा फ्लॅट डिस्काऊंट मिळत आहे. बँक ऑफर्ससोबत ही डील आणखी स्वस्त होते.