कामे न करताच 1 कोटी 47 लाखांचे बिल अदा

छत्रपती संभाजीनगरातील लासूर येथील शाळा आणि गुरुधानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामात मोठय़ा प्रमाणात घोटाळा झाला असून कोणतेही काम न करता ठेकेदाराला 1 कोटी 47 लाखांचे बिल अदा करण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह शाखा अभियंता, प्रभारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. विभागीय चौकशी नेमून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत दिली.