
वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सेवेप्रमाणे मोनोरेलची सेवा सोमवारी सकाळी कोलमडली. चेंबूर स्थानकातून सुटलेल्या मोनोच्या रेकमध्ये काही अंतरावरच तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ती गाडी माघारी आणण्यात आली. त्याचा मोनोरेलच्या संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम झाला. कामावर जाण्याच्या घाईच्या वेळेत प्रवाशांची गैरसोय झाली. यादरम्यान मोनोरेलच्या सर्व स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती. 11 वर्षांपूर्वी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या मोनोरेलच्या मार्गावर अनेक जुन्या गाड्या धावताहेत. त्या गाड्यांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे.