
धारावीपाठोपाठ आता गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास अदानी समूह करणार आहे. म्हाडा आणि कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती केलेल्या अदानी समूह यांच्यात सोमवारी मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी करार करण्यात आला.
तब्बल 142 एकर जागेवर मोतीलाल नगर 1, 2 व 3 ही म्हाडा वसाहत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने म्हाडाला कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीच्या माध्यमातून हा पुनर्विकास करायला परवानगी दिल्यानंतर मोतीलाल नगरच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने निविदा मागवल्या होत्या. ही निविदा अदानी समूहाला मिळाली. या पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला 3 लाख 97 हजार 100 चौरस मीटर क्षेत्र विकासकाकडून बांधून मिळणार आहे.
रहिवासी 2400 चौरस फुटांच्या घरांवर ठाम
या वसाहतीत 3700 गाळे असून पुनर्विकासात तेथील रहिवाशांना 1600 चौरस फुटांचे घर तर दुकानदारांना 987 चौरस मीटर चौरस फुटांचे दुकान दिले जाणार आहे. मात्र, आम्हाला 2400 चौरस फुटांचे घर आणि 2100 फुटांचे दुकान मिळावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.