Gopal Khemka murder: उद्योगपती गोपाल खेमका हत्या प्रकरणातील आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार

Gopal-Khemka-murder

बिहारमधील प्रसिद्ध व्यावसायिक गोपाल खेमका यांच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी, विकास, सोमवारी रात्री पाटणा येथील मालसलामी परिसरात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. गोपाल खेमका यांच्या हत्येच्या वेळी विकास हा मुख्य हल्लेखोर उमेशसोबत होता असा पोलिसांचा दावा आहे. उमेशनेच खेमका यांच्या पाटणा येथील निवासस्थानाबाहेर गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. यापूर्वी, पोलिसांनी उमेशला अटक केली होती.

गेल्या शुक्रवारी रात्री उशिरा उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या करण्यात आली होती. ते त्यांच्या घराच्या परिसरात गाडीत बसले असताना एका हल्लेखोर त्यांच्या वाहनाजवळ आला आणि गोळीबार करून पसार झाला. गोपाल खेमका हे मगध हॉस्पिटलचे मालक होते आणि त्यांचे अनेक पेट्रोल पंप देखील होते. सात वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचीही हाजीपूरमध्ये जमिनीच्या वादातून हत्या झाली होती.

या हाय-प्रोफाइल हत्या प्रकरणामुळे नितीश कुमार सरकार अडचणीत आले आहे. सध्या जेडीयू आणि भाजप विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागली आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष, राजद आणि काँग्रेस, बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य करत आहेत.

Bihar Businessman Gopal Khemka Murder Case

Vikas, an accused in the high-profile murder of Bihar businessman Gopal Khemka, was killed in a police encounter in Patna. Main shooter Umesh arrested.