
देशात यूपीआयने पेमेंट करण्याचे प्रमाण वाढत आहे. युपीआयने पेमेंट करणे आणखी सुलभ व्हावे, यासाठी लवकरच यूपीआय पेमेंटमध्ये स्मार्ट अपग्रेडेशन होणार आहे. त्यामुळे पेमेंट करण्यासाठी मोबाईल अॅप किंवा थर्ड पार्टी इंटरफेस उघडण्याची गरज नाही. युपीआयच्या माध्यमातून तुमची कार, स्मार्टवॉच, स्मार्ट टीव्ही देखील पेमेंट करू शकतील. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय ) यूपीआयचे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज व्हर्जन’ तयार करत आहे. याद्वारे वेगवेगळे स्मार्टफोन डिव्हाईस स्वतःच सुरक्षितपणे पेमेंट करू शकतात.
डिव्हाईस काय करू शकते
- कार पार्किंगचे शुल्क स्वतःच भरेल.
- स्मार्टवॉचमधून मेट्रोचे तिकीट किंवा दुकानाचे पेमेंट होईल.
- स्मार्ट टिव्ही आपले ओटीटी सबस्क्रीप्शन स्वतःच रिन्यू करू शकते.
यूपीआयची क्रेझ
- जून 2024 मध्ये युपीआयद्वारे 18.4 अब्ज ट्रान्झॅक्शन झाले.
- आर्थिक वर्ष 2025 मध्ये 185.8 अब्जांचा व्यवहार झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही 41.7 टक्के वाढ आहे.
नवीन यंत्रणा कशी काम करेल…
- प्रत्येक स्मार्ट डिव्हाईसला एक वेगळ्या प्रकारचा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस मिळेल, जो मुख्य यूपीआय अॅड्रेसला जोडलेला असेल.
- स्मार्ट डिव्हाईस आधी ठरवलेल्या वेळेमध्येच पेमेंट करेल.
- ओटीपीद्वारे डिव्हाईस लिंक केला जाईल.
- कोणत्याही वेळी युजर अॅपच्या माध्यमातून आदेश किंवा वेळेची सीमा बदलू शकतो.
- नवीन फीचर यूपीआय ऑटोपे आणि यूपीआय सर्कलसोबत इंटीग्रेड असेल. जेणेकरून दुसऱ्या व्यक्ती किंवा डिवाईसला युसर्ज पूर्वपरवानगी देऊ शकेल.
- इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित फीचरला अद्याप परवानगी मिळालेली नाही. यावर्षीच्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्ये फीचर लाँच होईल.