
मोबाईल आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जगभरात दबदबा असलेली Apple कंपनी पुन्हा चर्चेत आहेl. Apple ने कंपनीचे नवीन सीओओ (Chief Operating Officer) म्हणून सबीह खान यांची नियुक्ती केली आहे. हिंदुस्थानी वंशाचे साबीह खान हे मूळचे उत्तर प्रदेशातील मुरादाबादचे आहेत.
मस्क यांच्या संपत्तीत 15.3 अब्ज डॉलर्सची घसरण, जिगरी दोस्त दुश्मन बनल्याने आर्थिक फटका
कोण आहेत साबीह खान?
साबिह खान 1995 पासून Apple संबंधित आहेत. म्हणजेच गेल्या 30 वर्षांपासून ते या कंपनीत काम करत आहेत. कंपनीचे कामकाज आणि उत्पादन यंत्रणा इतक्या उत्तम प्रकारे हाताळली आहे की, स्वतः Appleचे सीईओ टिम कुक त्यांच्या कामाचे स्तुती करतात. आता त्यांना कंपनीचे नवीन ऑपरेशन्स हेड म्हणजेच सीओओ बनवण्यात आले आहे. सबीह खान यांनी अमेरिकेतील टफ्ट्स विद्यापीठतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी आणि नंतर एमबीए केले. त्यांचे शालेय शिक्षण हिंदुस्थानातच झाले.
अँड्रॉइड युजर्सची हेरगिरी गुगलला महागात, युजर्सना मिळणार 2600 कोटी रुपयांची भरपाई
साबीह खान यांच्या आधी Apple चे सीओओ जेफ विल्यम्स यांना मूळ वेतन 1 दशलक्ष डॉलर (सुमारे 8 कोटी रुपये) मिळत होते. बोनस आणि इतर सुविधा जोडल्यानंतर त्यांची एकूण कमाई सुमारे 23 दशलक्ष डॉलर (सुमारे 191 कोटी रुपये) पर्यंत पोहोचत होती. असे म्हटले जातेय की, सबीह खानचे वेतनही याच्या आसपास असू शकतो. परंतु Apple ने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
साबीह एक हुशार रणनीतिकार – टीम कुक
साबीह एक हुशार रणनीतिकार आहे जो Apple च्या पुरवठा साखळीच्या मुख्य शिल्पकारांपैकी एक आहे. अॅपलची पुरवठा साखळी पाहता साबीहने प्रगत उत्पादनात, नवीन तंत्रज्ञानाचा पाया रचण्यास मदत केली आहे. अमेरिकेत अॅपलच्या उत्पादनाचा विस्तार करण्यात त्याची मोठी भूमिका आहे. आणि जागतिक आव्हानांचा सामना करताना Apple ला बळकट करण्यास मदत केली आहे, अशी प्रतिक्रिया साबीह यांच्या नियुक्तीवर कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी दिली आहे.