गोपीचंद पडळकरांच्या भावाने लाटली 17 एकर जमीन! न्यायासाठी 82 वर्षांच्या विठाबाईंचं आझाद मैदानावर धरणे आंदोलन

मला न्याय द्या… असे म्हणत 82 वर्षांच्या विठाबाई बापू पडळकर यांनी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे. पेन्शनचे आमिष दाखवून आपली 17 एकर जमीन लाटल्याचे सांगत सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या विठाबाईंवर 82 व्या वर्षी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. कोर्टात या प्रकरणी खटला सुरू आहे. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकण्यात येत आहे, असा आरोप विठाबाईंच्या कुटुंबियांनी केला.

संजय गांधी निराधार योजनेतून निवृत्तीवेतन सुरू करून देतो, असे सांगून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावाने आणि निकटवर्तीयांनी आपली फसवणूक केली. कागदपत्रांवर अंगठे घेतले आणि आपली 17 एकर जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली, असे 82 वर्षांच्या विठाबाई बापू पडळकर म्हणाल्या. पेन्शनचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचा आरोप विठाबाईंनी केला आहे.

ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका, शरद पवार यांनी महायुती सरकारला सुनावले

जमीन मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवर दाद मागितली. पण कोणालाही पाझर फुटला नाही. विठाबाई गोपीचंद पडळकर यांच्या भावकीतल्याच पण आमदार असूनही पडळकरांची त्यांना कसलीही मदत केली नाही. उलट पडळकरांच्या जवळच्या लोकांनी धमकावले, असे विठाबाई यांनी सांगितले. शासन दरबारी कुठेही दाद मिळत नसल्याने अखेर नाईलाजास्तव विठाबाई सांगलीहून मुंबईत आझाद मैदानावर आल्या. जमिनीसाठी विठाबाई यांचे 3 जुलैपासून आझादा मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाची सरकारच्या एकाही मंत्र्याने दखल घेतलेली नाही. विठाबाईसारख्या वयोवृद्धेचीच नव्हे तर सांगली जिल्ह्यातील महारवतनाच्या जमिनीही धाकदपटशावर हडपल्या केल्याचे आरोप होत आहेत.

संभाजीनगर वसतिगृह प्रकरण; जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याचे निलंबन, अंबादास दानवेंच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारची कारवाई