
बॉलिवूड निर्माता अनुराग बसू लवकरच किशोर कुमार यांच्या जीवनपटावर काम सुरू करणार आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून अनुराग बसू किशोर कुमार यांच्यावरील जीवनपट बनविण्याच्या विचारात आहेत. परंतु प्रत्येक वेळी काही ना काही अडचण येतेच. मिळालेल्या बातमीनुसार, आमिर खान किशोर कुमार यांच्या जीवनपटात महत्त्वाची भूमिका वठवणार आहे. अशी माहिती दिग्दर्शक अनुराग बसू यांनी शेअर केली आहे.
किशोर कुमार यांच्या जीवनपटाची घोषणा पहिल्यांदा 2012 मध्ये ‘बर्फी’ चित्रपटाच्या यशानंतर करण्यात आली होती. यात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. त्यावेळी किशोर कुमारची भूमिका साकारण्यासाठी रणबीरची निवड केली होती. परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार, या जीवनपटासाठी बायोपिकसाठी आमिर खानशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यामुळे आता आमिरनेही किशोर कुमार यांची भूमिका वठवण्यासाठी कंबर कसली आहे.
चित्रपटासंदर्भात अनुराग बसू आणि आमिर खान यांच्यात 4-5 बैठका झाल्याचेही समजते. दोघांनी चित्रपटाच्या कथेवर आणि व्यक्तिरेखेवर सविस्तर चर्चा केली असून, आता आमिरने किशोर कुमार यांची भूमिका करण्यासाठी तयारीही दर्शवली आहे. चित्रपटाची अधिकृत घोषणा मात्र अद्यापही झाली नाही. आमिर की रणबीर या दोघांमध्ये किशोर कुमार यांच्या भूमिकेसाठी कोण फायनल होणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. परंतु चर्चेमध्ये आमिर खानचे नाव आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
आमिर खान हा कायमच वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्यात आघाडीवर राहिला आहे. त्यामुळेच किशोर कुमार यांची भूमिका वठवण्यासाठी तो अधिक मेहनत घेणार यात शंकाच नाही. रणबीर कपूर सुद्धा आधी या भूमिकेसाठी आधी तयार होता. परंतु अजूनही शेवटचा पडदा उघडायचा बाकी आहे, येत्या काही काळात तो पडदा उघडेल. त्याचवेळी आपल्याला कळेल किशोर कुमार यांची भूमिका कोण वठवणार आमिर की रणबीर?