
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर मंकी हिलजवळ शुक्रवारी दुपारनंतर मालगाडी घसरली. यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत आणि लोणावळादरम्यान ही घटना घडली असून पुणे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी, प्रशासनाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवी जखमी झाले नाही.