Satara News – रीलसाठी स्टंट करताना गाडीवरील नियंत्रण सुटले, कार थेट 300 फूट दरीत कोसळली

रीलसाठी स्टंट करताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट 300 फूट दरीत कोसळल्याची घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. या अपघातात कार चालक तरुण गंभीर जखमी झाले आहेत. कारमधील अन्य तीन तीन तरुण किरकोळ जखमी झाले. साताऱ्यातील सडावाघापूर येथील उलट्या धबधब्याजवळ ही घटना घडली.

साहिल चार मित्रांसोबत उलटा धबधबा येथे आला होता. साहिल तीन मित्रांसोबत कारमध्ये स्टंट करत होता. तर एक मित्र मोबाईलमध्ये रील शूट करत होता. स्टंट करताना साहिलचे नियंत्रण सुटले अन् कार 300 फूट दरीत कोसळली. सुदैवाने एका झाडावर कार अडकल्याने खोल दरीत पडता पडता वाचली आणि जीवितहानी टळली. या अपघातात साहिल गंभीर जखमी झाला.

पावसाळ्यातील दुर्घटना लक्षात घेत पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. मात्र पर्यटनस्थळांजवळील व्यावसायिकांच्या नाराजीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवरील बंदी हटवून निर्बंध घातले.