Monsoon Session 2025 – पोषण आहारात भ्रष्टाचार करणाऱ्यांना काळ्या यादीत टाका, वडेट्टीवार यांची मागणी

राज्यातील अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांना देण्यात येणारा पोषण आहार अत्यंत नित्कृष्ट दर्जाचा असून असा आहार पुरवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनाने नोंद घेऊन कारवाई करावी असे निर्देश दिले.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत मिलेट बार देण्यात येतात. धाराशीव तालुक्यातील पाच शाळांमध्ये या बारमध्ये अळ्या सापडल्या. अन्न व औषध प्रशासनाने तपासणी न करता याचा पुरवठा झालाच कसा, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. पनवेल इथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत गर्भवती माता आणि लहान बालकांना दिला जाणारा पोषण आहारही नित्कृष्ट आढळला आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.