
शिवसेनेची अंगिकृत संघटना शिव विधी व न्याय सेनेच्या वतीने प्रतीक्षानगर शिवसेना शाखा क्रमांक 173 मध्ये उद्या, शनिवारी संध्याकाळी 6 वाजता शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते मोफत कायदेशीर सल्ला केंद्राचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष अॅड. नितिश सोनवणे, उपाध्यक्ष (प्रभारी) अॅड. स्वप्ना कोदे, सरचिटणीस अॅड. मनोज कोंडेकर, चिटणीस अॅड. सुमित घाग, चिटणीस अॅड. दर्शना जोगदनकर, समन्वयक अॅड.भूषण मेंगडे, सदस्य गिरीश दिवाणजी यांच्यासह विभागप्रमुख प्रमोद शिंदे, विभाग संघटक पद्मावती शिंदे, विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, माजी नगरसेवक रामदास कांबळे, शाखाप्रमुख संजय म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.