
रेल्वे परीक्षेच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार उमेदवारांना आता आपल्या धार्मिक प्रतीकांसह परीक्षा देता येईल. म्हणजे हातातील कडं, धागा, डोक्याला पगडी, टिकली घालून रेल्वे परीक्षेला बसता येईल.
आतापर्यंत रेल्वे परीक्षेच्या वेळी धार्मिक प्रतीक घालून परीक्षा देण्यास मनाई करण्यात येत होती. रेल्वेच्या परीक्षेत पारदर्शकता असावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी हा नियम होता. मात्र तो आता शिथिल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये रेल्वेची भरती होती. त्यावेळी परीक्षा देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या हातातील लाल धागा काढून टाकण्यात आला होता. पंजाबमध्येदेखील असाच प्रकार घडला होता. त्यामुळे उमेदवारांनी संताप व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला. उमेदवारांचा वाढता विरोध पाहून रेल्वेने नियम बदलायचे ठरवले.