महसूल विभागातील बारा अधिकारी झाले सनदी अधिकारी

राज्याच्या महसूल खात्यातील बारा वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती देण्यात आली आहे. बारा ज्येष्ठ अधिकाऱ्यांना आयएएस कॅडर मिळाल्याची अधिसूचना आज केंद्र सरकारने जारी केली आहे. या अधिकाऱ्यांना लोकसेवा आयोगाने पदोन्नती दिली आहे. पदोन्नतीमध्ये प्रतिभा इंगळे, गजेंद्र वावणे, विजयसिंह देशमुख, सोनाली मुळे, विजय भाकरे, राजलक्ष्मी शहा, त्रिगुण कुलकर्णी, गजाजन पाटील, आशा पठाण, महेश पाटील, पंकज देवरे, मंजिरी मनोलकर यांचा समावेश आहे.