
अमेरिकेच्या डिफेन्स सिस्टमने आपल्या एआय स्ट्रटजीला आणखी मजबूत करण्यासाठी चार मोठय़ा टेक पंपन्या ओपनएआय, गुगल, अँथ्रोपिक आणि इलॉन मस्क यांच्या एक्सएआयसोबत 200 मिलियन डॉलर्स म्हणजेच 1600 कोटी रुपयांपर्यंत करार केला आहे. एआय आता केवळ स्मार्टपह्न किंवा चॅटबॉटपर्यंत मर्यादित राहिली नाही, तर अमेरिका याला डिफेन्स सिस्टममध्ये आणणार आहे.
या कंपन्यांच्या मदतीने अमेरिकन लष्करात एआयचा वापर करण्यात येणार आहे. या चार पंपन्यांना अजेटिंक एआय वर्पफ्लो तयार करणे म्हणजेच एआयला स्वतः निर्णय घेण्यात योग्य बनवणे, राष्ट्रीय सुरक्षा आणि युद्धात वापर करण्यासाठी वापर करणे, तसेच अडवॉन्स्ड फ्रंटियर एआय सिस्टम डेव्हलप करण्याचे काम देण्यात आले आहे. इलॉन मस्क यांची कंपनी एक्सएआयने नवीन मॉडल्सची रेंज लाँच केली आहे. याचे नाव ग्रोक फॉर गव्हर्नमेंट इंडिया आहे. नुकतेच लाँच करण्यात आलेले ग्रोक 4 मॉडल आता सरकारी कामासाठी उपलब्ध होईल. एप्रिल 2025 मध्ये ‘व्हाईट हाऊस’ने सरकारी एजन्सीला एआय स्वीकारण्यासाठी आदेश दिला होता. एआयचा वापर आरोग्य, सुरक्षा, विज्ञान या सेक्टर्समध्ये वाढणार आहे.