असं झालं तर… डेबिट कार्ड विसरलात तर…

  • बऱ्याचदा एटीएममधून पैसे काढताना घाई गडबडीत डेबिट कार्ड हे एटीएममधून पैसे काढल्यानंतर ते मशीनमध्येच विसरले जाते. हे अनेक ग्राहकांच्या बाबतीत घडते.
  • जर डेबिट कार्ड एटीएम मशीनमध्ये अडकले किंवा विसरून राहिल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. शांत राहा. घाबरून जाऊ नका. ज्या ठिकाणी विसरले, तेथे जा.
  • सर्वात आधी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रावर किंवा बँकेच्या शाखेत त्वरित संपर्क साधा. कार्ड हरवल्याची किंवा अडकल्याची तक्रार नोंदवा. कार्ड ब्लॉक करण्याची विनंती करा.
  • बँकेच्या मदतीने तुम्ही नवीन डेबिट कार्ड मिळवण्यासाठी अर्ज दाखल करू शकता. बँकेत तक्रार नोंदवल्याचा पुरावा जपून ठेवा. अर्ज केल्यानंतर बँकेकडून नवीन कार्ड मिळते.
  • एटीएममधून पैसे काढताना तुमच्या आजूबाजूला कोणी आहे का हे पहा. तुमचा पिन कोणालाही सांगू नका. एटीएममधून पैसे काढल्यानंतर पैशांसोबत कार्ड घ्यायला विसरू नका.