पोलिसांना मेकअप, रील्सवर बंदी

बिहारमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी डय़ुटीवर असताना मेकअप न करण्याच्या सूचना बिहार पोलीस मुख्यालयाने दिल्या आहेत. पोलीस दलात कडक शिस्त लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

या नव्या नियमानुसार, डय़ुटीवर रील बनवणे, सोशल मीडियावर शस्त्रs दाखवणे किंवा खासगी संभाषणासाठी ब्लूटूथ वापरणे यापुढे करता येणार नाही. हे सर्व निर्देश महिलांसोबत पुरुष पोलिसांनासुद्धा लागू करण्यात आले आहेत. पोलीस वर्दीचा अवमान होईल, असे कोणतेही पृत्य केल्यास संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. बिहार पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी मेकअप आणि दागिन्यांवर स्पष्टपणे बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.