Jammu Kashmir – भरधाव ट्रकची कारला धडक, अपघातात अमरनाथला चाललेले 8 भाविक जखमी

भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याने अमरनाथ यात्रेला चाललेले आठ भाविक अपघातात जखमी झाले. जम्मू कश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात शुक्रावारी ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन भाविक किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करत ट्रक जप्त केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

उधमपूरच्या बट्टल बलियान भागात पहलगाम बेस कॅम्पला जाणाऱ्या यात्रेकरूंना वेगाने येणाऱ्या ट्रकने बॅरिकेड तोडून कारला धडक दिली. बॅरिकेडवर सीआयएसएफचे जवान तैनात असतानाही ट्रकने कारला धडक दिल्यानंतर डिव्हायडर ओलांडला आणि एका घराच्या भिंतीवर आदळला. अपघातग्रस्त कार शुक्रवारी सकाळी जम्मूहून पहलगाम आणि बालटाल या बेस कॅम्पकडे चालली होती.