एके 203… खतरनाक गन! मिनिटात 700 गोळ्या झाडणार

हिंदुस्थानी लष्कराला लवकरच एकदम खतरनाक अशा ‘एके 203’ रायफलींचा नवा साठा मिळणार आहेत. तब्बल 7 हजार एवढ्या या रायफली आहेत. त्यांची रेंज 800 मीटर आहे. त्यातून एका मिनिटांत 700 राऊंड गोळ्या सटासट मारता येतील. ‘एके 203’ गनची निर्मिती हिंदुस्थान आणि रशिया दरम्यान झालेल्या करारात उत्तर प्रदेशातील अमेठी येथे होतेय. जगातील सर्वाधिक घातक रायफल अशी तिची ओळख आहे.

या बंदुकीचे वैशिष्ट्ये काय?

  • एके 203 रायफलीतून 7.62 बाय 39 एमएम गोळ्या मारल्या जातील. त्याची रेंज 800 मीटर आहे. एवढ्या दीर्घ अंतरापर्यंत गोळ्यांची ताकद टिकून राहील.
  • रायफलची लांबी 37 इंच आहे. तिला छोटे करून 27.8 इंच केले जाऊ शकते. त्याच्या बॅरेलची लांबी 16.3 इंच आहे. गरजेनुसार रायफलीची लांबी कमी-जास्त करू शकतो.
  • प्रत्येक मिनिटाला 700 गोळ्या सुटतील. सिंगल मोडमध्ये एकदा ट्रिगर दाबल्यावर एक गोळी फायर होऊ शकते. फुल ऑटो मोडमध्ये ट्रिगर दाबल्यावर गोळ्या सटासट सुरू होतील. मॅगझीन संपेपर्यंत गोळ्या सुटतील.
  • एके 203 ही गॅस ऑपरेटेड रायफल आहे. एके 47 सारखा तिचा वापर करणे सोपे आहे. जास्त मेंटेन्सची गरज नाही.